1.पिकांच्या वाढीसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश हे अत्यंत महत्त्वाचे अन्नघटक असून माती परीक्षणामुळे आपल्या माती मधिल या तीन घटकांचे नेमकं प्रमाण किती आहे ते कळतं की ज्यावरून ते प्रमाण कमी आहे, जास्त आहे की पुरेस आहे हे ठरवता येते.
2.नत्र, स्पुरद आणि पालाश या महत्त्वाच्या घटकांची जमिनीतील उपलब्धता, माती परीक्षण अहवाल वरून माहिती करून घ्या व पीक घेताना कोणती खत वापरावीत किंवा किती प्रमाणात वापरावीत हे ठरवून खतांचा वापर करा.
3.नत्र म्हणजेच नायट्रोजन (Nitrogen)- पिकांमधील Amino Acid, Protein, Nucleic Acid, Nucleotide, Enzyme (संप्रेरके), Hormones बनवण्यासाठी,पानांचा हिरवा रंग व वाढ (Growth), शेड्यांकडिल वाढ (Shoot Growth Activator) या सर्व गोष्टींसाठी नायट्रोजन आवश्यक असते.
4.स्फुरद म्हणजेच फॉस्फोरस (Phosphorus)- फॉस्फोरस हा पिकांचा आत्मा आहे . त्याचा वापर पिकांना त्यांच्या पेशींमध्ये एनर्जी मोलेक्युल (ATP) तयार करण्यासाठी होतो. तसेच मूळांची वाढ (Root Growth Activator)करणे ,प्रजनन क्रिया सुरळीत करणे, फळांची गुणवत्ता सुधारणे, गरज पडल्यावर मॅग्नीशियम (Mg) वहनास मदत करणे यासाठी होत असतो. पण स्पुरदचे प्रमाण जास्त झाल्यास लोह व झींक कमतरता जाणवते.
5.पालाश म्हणजेच पोटॅशियम (Potassium): पोटॅशियम योग्य प्रमाणात पिकांना मिळाल्यास पिकांची रोग प्रतिकारक शक्ती (Plant Immunity) वाढवतो. पाण्याचा समतोल (उचित शोषण) ठेवण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. पानांवरील जे पर्ण रंध्र (stomata) असतात यांना क्रियान्वित ठेवण्यासाठी याची मदत होते. साखर, स्टार्च निर्मिती व वाहतूक, तेलबियांमध्ये तेलाचे प्रमाण वाढवणे, फळांची गुणवत्ता वाढवणे, नायट्रोजन च्या जास्त प्रमाणामुळे होणाऱ्या इजांची भरपाई करणे हे सर्व पालाश चे कार्य आहेत.
6.या सर्व गोष्टींचा समतोल राखण्यासाठी नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे जमिनीतील प्रमाण किती आहे हे माहिती करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे, हे माहिती करून घेण्यासाठी आजच आपल्या जवळच्या आनंद बायोकेम रिसर्च अँड डेवएलोपेमेंट लॅब ला भेट देऊन आपल्या जमिनीतील मातीचे परीक्षण करून घ्या.